महाराष्ट्र

maharashtra

मूर्तिजापूर मतदारसंघ: भाजपचे आमदार पिंपळे हॅट्रिकच्या तयारीत; विरोधकांचे कडवे आव्हान

By

Published : Sep 21, 2019, 12:43 PM IST

जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे हे २ वेळा आमदार झाले आहेत. या वेळीही पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाल्यास ते तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. १ हजार ३०५ कोटींची कामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदार पिंपळेंना मात्र, विरोधकांचे कडवे आव्हान आहे.

मूर्तिजापूर मतदारसं

अकोला - जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे हे २ वेळा आमदार झाले आहेत. या वेळीही पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाल्यास ते तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. १ हजार ३०५ कोटींची कामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदार पिंपळेंना मात्र, विरोधकांचे कडवे आव्हान आहे. या राखीव मतदारसंघात आपले मतदार खेचण्यात भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडी यावेळी तरी यशस्वी होईल का याकडे लक्ष लागले आहे.

या राखीव मतदारसंघात भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीची मतदारांची संख्या जास्त आहे. असे असताना येथे या पक्षाकडून नेहमीच पार्सल उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची मागणी करणाऱ्या या मतदारांनी नेहमीच पार्सल उमेदवारास बाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून आलेला नसल्याचा इतिहास आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम बिडकर हे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आघाडीत प्रबळ उमेदवार नसल्याने त्यांचा पराभव नेहमीच झाला आहे. तर भाजप सेना युतीत हा मतदारसंघ भाजपला सुटलेला असताना त्यांनी संधीचे सोने केले. २ वेळा भाजपने येथे बाजी मारली आहे.

मूर्तिजापूर मतदारसंघ: भाजपचे आमदार पिंपळे हॅट्रिकच्या तयारीत

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

हेही वाचा - पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

आमदार हरीश पिंपळे यांनी या मतदारसंघांमध्ये सिंचनाची कामे, दळणवळणाची कामे, सामाजिक सभागृह, व्यायाम शाळा यासह आदी विकासात्मक कामे केली आहेत. १ हजार ३०५ कोटी रुपयांचा निधी आणून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास साधला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या विकासातून मात्र, मुर्तीजापुर शहर अजूनही पाण्यासाठी कोरडेच आहे. या शहरातील रस्त्यांचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यासोबतच मूर्तिजापूर ते बार्शीटाकळी या दोन्ही तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये जाण्यासाठी असलेले रस्तेही विकासापासून दूर आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार रवी राठी यांनी शहरातच नव्हे तर मतदारसंघाचाही विकास झाला नसल्याचा आरोप केला आहे.

सिंचनाचे प्रश्न, बेरोजगारी आणि रखडलेले प्रकल्प 'जैसे थे'च असल्याचा त्यांनी दावा केला आहे. नगरसेवक आशिष बरे हे युवा स्वाभिमान पक्षावरून निवडणूक लढवणार आहेत. शहरातील विकासकामे आणि युवकाच्या संघटनातून ही विधानसभा विजयी होणार असल्याचा त्यांना विश्वास आहे.

शेतकरी बचत गट, नाबार्डच्या योजना, सूतगिरणीचा प्रकल्प असे विविध उपाय योजना करत बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्यत्न करणार असल्याचे वंचितचे इच्छुक उमेदवार कश्यप जगताप यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाने जर संधी दिली तर या संधीचे सोने करीत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार हरीश पिंपळे यांनी मुर्तीजापुर मतदारसंघात हजारो कोटींची कामे केल्याचा दावा केलाय. तर विरोधक त्यांच्या या दाव्याला फोल ठरवीत आहे. युतीत हा मतदारसंघ जर सेनेला सुटला तर युतीचा धर्म समजून कार्यकर्ता म्हणून प्रचार करणार असल्याचे पिंपळेंनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details