अकोला -पारंपरिक पद्धतीच्या शेतीचे दिवस आता कालबाह्य झाले असून जमिनीचा पोत, उपलब्ध सिंचन सुविधा, बाजारपेठेचा आढावा घेत परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले. ही भविष्यातील फायदेशीर शेतीची नांदी आहे, असे ते म्हणाले. कृषी विद्यापीठ आपल्या शेतीविषयक प्रत्येक शंकेचे समाधान करण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पारंपरिक पद्धतीच्या शेतीचे दिवस आता कालबाह्य - कुलगुरू डॉ. विलास भाले
पारंपरिक पद्धतीच्या शेतीचे दिवस आता कालबाह्य झाले असून जमिनीचा पोत, उपलब्ध सिंचन सुविधा, बाजारपेठेचा आढावा घेत परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहाणी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेतली.
प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहाणी व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आज बाळापूर तालुक्यातील अडोशी- कडोशी परिसरातील शेतांना भेट दिली. पीक पाहाणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनात सूर्यफूल, ज्वारी, करडई, ओवा, हरभरा, सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी याच भागांतील असल्याचे त्यांनी सांगितले.
फक्त जंगली प्राण्यांच्या उपद्रवाने अधिक फायदा देणारी पीके घेता येत नसल्याची खंत प्रगतिशील शेतकरी पांडुरंग गायकी यांनी व्यक्त केली. कापूस पिकातील बी.टी. वाण लागवड करताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात देखील यावेळी चर्चा झाली. विद्यापीठाने कपाशीचे बी.टी. वाण तसेच सोयाबीन, उडीद, तुर या पिकांचे भरघोस उत्पन्न देणारे नवे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. यावेळी पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते.