नाशिक - केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी नवे कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई वाहन माेर्चा काढला जाणार आहे. शनिवारी हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानातून २० हजार शेतकरी वाहने घेऊन मुंबईकडे कूच करणार आहे.
राज्यपालांना देणार मागण्यांचे निवेदन -
देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजभवनांवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याकरिता किसान सभेचा हा वाहनमार्च मुंबई येथील आझाद मैदान येथे रविवारी पोहोचेल. सोमवारी सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथे सभा होणार आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. त्यानंतर हा वाहन मोर्चा राज भवनाच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार असल्याची माहिती डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
यांचा असेल सहभाग -