अकोला - जिल्ह्यात 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीच्या जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत या निवडणुकीत मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे यावेळी प्रचारासाठी उपस्थित राहणार नाही. ते पहिल्यांदा तीन महिने पक्षापासून दूर राहणार आहेत. म्हणजेच ते तीन महिने रजेवर राहणार आहे. यासाठी त्यांनी प्रभारी प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. त्यांच्या निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले असून ऐन निवडणुकीच्या काळात त्यांची उपस्थित नसल्याने या निवडणुकीत आपण कमी जागा जिंकणार, अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
'वंचित'चे प्रकाश आंबेडकर तीन महिने पक्षासाठी कार्यरत नसणार - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होणार नाही आहे. त्यामुळे याकाळात पक्षाचा प्रभार तथा प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
'या' कारणामुळे आंबडेकर रजेवर
वंचित बहुजन आघाडी पक्षाचा राजकीय गढ अकोला जिल्हा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यासोबतच आता 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीच्या जागांची पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणूक वंचितसाठी महत्त्वाची आहे. अल्पमतात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये या निवडणुकीत पक्षाला यश न मिळाल्यास वंचितच्या हातून जिल्हा परिषदेची सत्ता जाण्याची भीती आहे. तसे संकेत कार्यकर्त्यांना आता वाटत आहे. याचा फायदा इतर राजकीय पक्ष घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकाश आंबेडकर पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होणार नाही आहे. त्यामुळे याकाळात पक्षाचा प्रभार तथा प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. अरुण सावंत हे प्रदेश कमिटी, जिल्हा, तालुका व सर्व कार्यकर्ते यांना मदत करतील, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, त्यांनी पक्षापासून दूर राहण्याचे कारण हे वैयक्तिक कारणामुळे तीन महिने दूर राहत असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान, पक्ष चालला पाहिजे, संघटन चालले पाहिजे आणि आंदोलन सुरू राहिले पाहिजे, असे सूचित केले आहे.