अकोला- महानगरातील रस्ते बांधणी दर्जाच्या सोशल ऑडिटला भाजपने केराची टोपली दाखवली आहे. रस्त्यांची कामे दर्जाहीन सुरू असल्याच्या विरोधात 'वंचित बहुजन आघाडी'ने स्कायलार्क हॉटेल समोरील सिमेंट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांत 'कमळा'ची फुले लावून भाजपचा निषेध केला. तसेच सोशल ऑडिटवर कार्यवाही करण्याचे आणि रस्ते बांधकाम दर्जेदार करण्याची मागणी केली.
हेही वाचा - सत्ताधारी शिवसेनेनेच ठोकले जलयप्रदाय विभागाला कुलूप; अकोला मनपातील अजब कारभार
महानगरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांचे सिमेंटीकरण करुन बांधकाम करण्यात आले आहे. या रस्त्यांवर वर्षभराच्या आतच मोठे खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचितने केला.