महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचितच्या नेतृत्त्वाखाली अकोल्यात शेतकरी आक्रोश मोर्चा; हेक्टरी 25 हजारांची मागणी - vba agitation

सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत फार कमी असल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोल्यात शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. मागणी मान्य केली नाही तर न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे वंचितच्यावतीने सांगण्यात आले आहे.

वंचितच्या नेतृत्त्वाखाली अकोल्यात शेतकरी आक्रोश मोर्चा

By

Published : Nov 22, 2019, 4:45 PM IST

अकोला - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 8 हजार रुपये आणि फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना 18 हजार मदत जाहीर केली आहे. ही मदत तोकडी असून या मदतीमध्ये वाढ करून हेक्टरी 25 हजार आणि बागायतदार शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत द्यावी. अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. वंचितच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

वंचितच्या नेतृत्त्वाखाली अकोल्यात शेतकरी आक्रोश मोर्चा

हेही वाचा -मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उप महापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरू आहे. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना भरपूर मदत देणे आवश्यक होते. परंतु, सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेली मदत फार कमी असल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता.

मोर्चाचे नेतृत्व प्रदेश प्रवक्ते प्रा. धैयरवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, माजी आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद सदस्यता प्रतिभा अवचार, अरुंधती शिरसाट, प्रदीप वानखेडे, गजानन गवई, महादेवराव शिरसाट, सचिन शिराळे, विकास सदांशीव, प्रा. प्रसन्नजित गवई, पराग गवई, यांच्यासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा - उल्हासनगर महापालिकेत भाजपला धक्का, महाविकास आघाडीच्या लीलाबाई आशान महापौर

ABOUT THE AUTHOR

...view details