अकोला - सार्वजनिक बससेवा सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'डफडे बजाव' आंदोलन केले. त्यानंतर आज राज्य शासनाने एसटी सेवा सुरू केली. आमच्या आंदोलनानेच राज्य शासनाला बससेवा सुरू करण्यास आम्ही भाग पाडल्याचा आनंद व्यक्त करीत 'वंचित'च्या पदाधिकाऱ्यांनी आज जुने बसस्थानक येथे बसचालकांचा सत्कार करीत बसमधून प्रवास केला.
'वंचित'कडून एसटीच्या वाहक-चालकांचा सत्कार; पदाधिकाऱ्यांनी 'असा' केला प्रवास
बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी परत जाण्यास अडचणी येत होत्या. याबाबत वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून सरकारला जागे केले.
कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्वच व्यवस्था बंद केली. त्यानंतर टप्प्याने ही व्यवस्था सुरू करण्याची शासनाने प्रक्रिया राबविली. मात्र, यामध्ये सार्वजनिक बससेवा बंद होती. बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी परत जाण्यास अडचणी येत होत्या. याबाबत वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करून सरकारला जागे केले. त्यानुसार शासनाने आजपासून बससेवा सुरू केली. हा आमचा विजय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हणत जुने बसस्थानक येथे बसचालक व वाचकांचा सत्कार केला. तसेच बसमधून प्रवास ही केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक यांनी वाहक शेषराव डोंगरे, व चालक जुमळे यांची शाल व टोपी घालून सत्कार केला.