महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला मंगरूळपीर रस्त्यावर झाडांसाठी वंचितचे चिपको आंदोलन... - प्रवक्ता राजेंद्र पातोडे

अकोला-मंगरूळपीर रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम करण्यात येते आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विकासाच्या नावावर रस्त्यावरची झाडे तोडू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील असलेल्या झाडांसाठी चिपको आंदोलन केले.

वंचितचे चिपको आंदोलन
झाडांसाठी वंचितचे चिपको आंदोलन

By

Published : Oct 22, 2020, 2:46 PM IST

अकोला -अकोला-मंगरूळपीर रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम करण्यात येते आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विकासाच्या नावावर रस्त्यावरची झाडे तोडू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील असलेल्या झाडांसाठी चिपको आंदोलन केले. संबंधित अधिकारी आले नाहीत तर, रस्त्याच्या बाजूची तोडलेली झाडे ही रस्त्यावर आणू, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला दिला आहे.

झाडांसाठी वंचितचे चिपको आंदोलन
अकोला ते मंगरूळपीर या ब्रिटिशकालीन रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे आहे. हजारो झाडे असलेला हा जिल्ह्यातील एकमेव रस्ता आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. आठराशेहून जास्त झाडे तोडण्यात येत आहेत. प्रशासनाने पाच ते दहा वयोगटातील झाडांचे वृक्षारोपण करावे आणि नंतरच ही झाडे तोडावी, असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. ही झाडे न तोडता, त्यांचे पुनर्रोपण करावे. तसेच विकासाच्या नावावर झाडे तोडून सरकार वृक्ष संवर्धनाचा खोटारडेपणा करीत असल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details