महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी कायदे रद्द करा; 'वंचित'चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - अकोला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन न्यूज

दिल्लीमध्ये केंद्राने पास केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवित आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

अकोला वंचित बहुजन आघाडी न्यूज
अकोला वंचित बहुजन आघाडी न्यूज

By

Published : Dec 17, 2020, 2:05 PM IST

अकोला - दिल्लीमध्ये केंद्राने पास केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवित आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

कृषी कायदे रद्द करा; 'वंचित'चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

हेही वाचा -नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक; पोलीस हवालदार जखमी

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून अदानी आणि अंबानी यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी संधी देत आहे. या केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून यामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासोबतच, स्वस्त धान्य दुकानामधून गरिबांना मिळणाऱ्या धान्यालाही गरिबांना या कायद्यामुळे मुकावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करीत दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, शहराध्यक्ष शंकर इंगळे, गजानन गवई, जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा अवचार, वंदना वासनिक, ज्ञानेश्वर सुलताने, रामा तायडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा -अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने केला बारबालेचा खून..

ABOUT THE AUTHOR

...view details