अकोला -अमरावती येथील आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी शिवकुमार यांच्यावर तर आरोप केला. त्या चिठ्ठीत वरिष्ठ अधिकारी रेड्डी व इतर अधिकाऱ्यांची नावे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली आहे. या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची माहिती असताना ही त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत वंचित बहूजन महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
'दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी'
त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत वंचित बहूजन महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
'त्यांना सहआरोपी करण्यात यावे'
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये वनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिलेल्या चार पानांच्या पत्रात त्या आत्महत्या का करत आहेत, हे लिहिले आहे. असे असले तरी विनोद शिवकुमारची अनेकदा तक्रार करूनही त्यांच्यावर वरीष्ठ अधिकारी एम. एस. रेड्डी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याला पाठीशी घातले. म्हणून एम. एस. रेड्डीसुद्धा दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा सहआरोपी करण्यात यावे, असे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.