महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचित आघाडीच्या बंदला अकोल्यात चांगला प्रतिसाद; कार्यकर्ते उतरले रस्त्यावर - वंचित बहुजन आघाडी न्यूज

वंचितचे पदाधिकारी बाजारपेठ बंद करण्यासाठी फिरत होते. तसेच कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणात चौका चौकामध्ये तैनात करण्यात आले आहेत.

vanchit bahujan aghadi protest
वंचित आघाडीच्या बंदला अकोल्यात चांगला प्रतिसाद

By

Published : Jan 24, 2020, 1:27 PM IST

Updated : Jan 24, 2020, 3:24 PM IST

अकोला- सीएए व देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीने आज(शुक्रवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला अकोला शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून सकाळी दहा वाजता उघडणाऱ्या बाजारपेठा अद्यापही बंद होत्या.

वंचित आघाडीच्या बंदला अकोल्यात चांगला प्रतिसाद

दरम्यान, वंचितचे पदाधिकारी बाजारपेठ बंद करण्यासाठी फिरत होते. तसेच कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणात चौका चौकामध्ये तैनात करण्यात आले आहेत. मलकापूर चौकामध्ये वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको करून तेथे दुकाने बंद केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 3

वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला हा गड आहे. त्यामुळे या बंदला वंचितचे सर्व पदाधिकारी यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आणि शहरामध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी रास्तारोकोसह मोर्चाही काढला होता.

बंद संदर्भातल्या सर्व बातम्या -

Last Updated : Jan 24, 2020, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details