महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबे पिकवण्यासाठी प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा वापर; अकोला पोलिसांची कारवाई

पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने जनता भाजी बाजार येथे आज दुपारी छापा टाकला. पथकाने या पदार्थांचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 27, 2019, 8:25 PM IST

अकोला- फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइड कारपेटचा तसेच मान्यताप्राप्त इथीलीनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने जनता भाजी बाजार येथे आज दुपारी छापा टाकला. पथकाने या पदार्थांचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

कारवाईची माहिती देताना अधिकारी

या कारवाई दरम्यान पथकाला कृत्रीमरित्या पिकविल्या जाणाऱ्या आंब्याच्या गोदामात कॅल्शियम कार्बाइड कारपेट तसेच इथीलीनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला जात असल्याचे दिसून आले. तसेच अमीरशहा इस्माईलशहा याच्या गोदामात आंब्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणात कच्चे आंबे विकत घेत असल्याचे आढळले. गोदामातील आंब्यांच्या कॅरेटची तपासणी केली असता, एका पांढऱया कागदी पाकीटामध्ये इथीलीनचे रायपनर आढळले. एका कॅरेटमध्ये जवळपास ६ ते ८ असे रायपनर मिळून आले.

कृत्रीमरित्या फळे पिकविण्यासाठी १०० पीपीएमपर्यंत इथीलीनचा वापर करण्याची परवानगी असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱयांनी सांगितले आहे. परंतु, त्याचा वापर करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबे व इथीलीन पुडी यांचे नमुने घटनास्थळावरून घेतले आहेत. ते तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे विशेष पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा सहभाग होता.

ABOUT THE AUTHOR

...view details