अकोला -वाडेगाव-पातुर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सोमवारी सायंकाळी आणि रात्री पडलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबतच फळबागांचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले असून काही रस्त्यांवरील झाडेही उन्मळून पडले आहेत.
हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार, अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक गावातील मातीची घरे पडले असून काही घरांवरील तीनही उडून गेले आहेत. तसेच, जोरदार वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडली आहे. त्यासोबतच काढणीला आलेले पिकाचेही मोठे नुकसान झाले. गहू व हरभऱ्याचे पीक पार झोपले आहे. वाडेगाव व पातुर या ठिकाणी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.