अकोला :जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या गारपीटीनेशेतातील संत्रा, लिंबू, कांदा आंबा पिकाला फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस तापमान असताना अचानक झालेल्या या हवामानातील बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने गेल्या चार ते पाच दिवसामध्ये अविदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. बार्शीठकाळी तालुक्यातील पातूर येथे पंधरवड्यापूर्वी अवकाळी पावसाने कहर केला होता. त्यामुळे हरभरा, गहू, कांदा, आंबा, संत्रा, लिंबू या पिकांचे मोठे नुकसान झाले. या घटनेला पंधरा दिवसही होत नसताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कहर केला आहे. या दोन तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा खराब हवामानाच्या तडाख्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ :पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. अवकाळी पावसात 15 दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला होता. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रांना बसला. कामगारांचा संप मागे घेतल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, त्या सर्व नुकसानीच्या भरपाईचे आदेश अद्यापही न मिळाल्याने शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आजच्या अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन्ही नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. तूर तालुक्यातील तुळंगा, बार्शीठकाळी या भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले. या गारपिटीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे सांगण्यात येत आहे.