महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अकोल्यात वंचितांना सत्ता देण्यासाठी आलो, बाळासाहेब आंबेडकरांना माझी ऑफर' - रामदास आठवले

पक्षाचा नाव हटविणाऱ्याना मिटविल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोल्यात केलेला प्रयोग चांगला केला असल्याचे कौतुक त्यांनी केले. गरिबी हटावचा नारा देणाऱ्यांनाना गरिबी हटविता आली नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

By

Published : Oct 3, 2019, 11:28 PM IST

अकोला- बाळासाहेब आंबेडकरांचा प्रयोग हा वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी चांगला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. अकोल्यातून त्यांनी माझ्यासोबत येण्याची ऑफर मी त्यांना दिली आहे. त्यांनी माझ्यासोबत यावे. अकोला पूर्वी हा माझा बालेकिल्ला होता. आता तो बाळासाहेबाचा आहे. उद्या माझा बालेकिल्ला होणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

'अकोल्यात वंचितांना सत्ता देण्यासाठी आलो, बाळासाहेब आंबेडकरांना माझी ऑफर'

वंचित समाजाला सत्ता देण्यासाठी मी अकोल्यात आलो असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीला लगावला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 62 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

पक्षाचा नाव हटविणाऱ्यांना मिटविल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोल्यात केलेला प्रयोग चांगला केला असल्याचे कौतुक त्यांनी केले. गरिबी हटावचा नारा देणाऱ्यांनाना गरिबी हटविता आली नाही. भाजपला पाठिंबा देण्याची नैतिक भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

टीका किती करायची असेल ती करा. तुम्हाला अधिकार आहे. पण ती पचविण्याची शक्ती माझ्याकडे आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून शिका. बाबासाहेबांचा विचार सर्वांना जोडणारा आहे. देशात राहायचे असेल त्याला संविधान मान्य करावे लागेल. जे संविधान मान्य करीत नाही त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. दलितांवर अत्याचार होत आहे. ते मिटविण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी जिवंत आहे तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान खाली जाऊ देणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच रिपब्लिकन पक्षाचे 4 ते 5 उमेदवार निवडून येणार असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राजा सरोदे, आयोजक तथा महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष त्र्यंबक शिरसाट यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details