महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ukraine Russia War Impact : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; युक्रेन रशिया युद्धामुळे खतांची टंचाई, किंमतीत दरवाढ होण्याची शक्यता! - शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी

अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने एकूणच प्रशासनाच्या वतीने नम्र आवाहन आहे ( Akola Agriculture Department appeals to farmers ) की, सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर खत साठा उपलब्ध आहे. जवळपास 20 हजार में. टन खत साठा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहे. तरीही त्यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या आवश्यक खत ही आताच उचल करावी.

Ukraine Russia War Impact
अकोला कृषी विभाग

By

Published : Mar 19, 2022, 5:57 PM IST

अकोला - युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खताचा तुटवडा निर्माण होऊन खतांची दरवाढ ( Ukraine Russia War Impact on fertilizer prices ) होऊ शकते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने एकूणच प्रशासनाच्या वतीने नम्र आवाहन आहे ( Akola Agriculture Department appeals to farmers ) की, सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर खत साठा उपलब्ध आहे. जवळपास 20 हजार में. टन खत साठा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहे. तरीही त्यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या आवश्यक खत ही आताच उचल करावी. त्यामध्ये शेतकरी बांधव, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी खतांचा साठा आता उचल करावी. जेणेकरून होणारी संभाव्य खतांची टंचाई होणारी दरवाढ यासून त्यांच्यात होणारी आर्थिक नुकसान हे टाळता येईल.

जि. प. कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांची प्रतिक्रिया

'डीएपी ऐवजी वापराही खते'

यासोबतच शेतकऱ्यांना आवाहन आहे की, डीएपी या खताऐवजी शेतकरी बांधवांनी युरीया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला. तर याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, आर्थिकदृष्ट्या खर्च कमी लागतो. आणि दुसरा त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सोबतच तिच्यामध्ये सल्फर, झिंक, बोराण अशा प्रकारचे आवश्यक सूक्ष्म द्रव्ये असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी ऐवजी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर करावा.

युक्रेन रशिया युद्धामुळे खतांची टंचाई किंवा किंमतीत दरवाढ!

खाताच्या किमतीत दरवाढ होण्याची शक्यता -

सध्या खताची दरवाढ झालेली नाही. परंतु, आपल्याला कल्पना आहे की, युद्ध आणि एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे आर्थिक दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच संभाव्य काळात दरवाढ किंवा खत टंचाई होऊ शकते, त्याचा परिणाम अकोला जिल्ह्यात होऊ नये, आता आपल्याकडे खतसाठा जेवढा उपलब्ध आहे त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

युक्रेन रशिया युद्धामुळे खतांची टंचाई किंवा किंमतीत दरवाढ!

हेही वाचा -Imtiaz Jalil : इम्तियाज जलील माझे वर्गमित्र मात्र, एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील : राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details