अकोला : केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हांवर शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दावा आहे. इतकेच नाही तर यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे पहिली सुनावणी झाली आहे. त्यात ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरू आहे. विशेषतः केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षांचे राजकीय चिन्ह किंवा त्या राजकीय पक्षाच्या चिन्हाबाबत प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी निवडणूक आयोग प्रामुख्याने एखाद्या राजकीय पक्षांची घटना निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली असते. तसेच, त्या घटनेनुसार त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडून आले आहेत का? ते कोणाच्या बाजूने आहे ही एक बाब तपासली जाते अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. ते अकोल्यातील बहुचर्चित किसनराव हुंडीवाले हत्याकांडाच्या सुनावणीसाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आज न्यायालयात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो : राजकीय पक्षाचे आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे कोणत्या गटाचे आहेत हे जास्त तपासले जाते. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटातून अनेक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. त्या प्रतिज्ञापत्रात दावे प्रतिदावे देखील तपासल्या जातात. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला निश्चितपणे ही बाब तपास करावी लागेल. हे प्रतिज्ञापत्र खरे आहे की खोटे आहे. त्यामध्ये सत्याचा लवलेश किती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.