महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मूर्तिजापूर रेल्वेस्थानकाजवळ दोन अनोळखी महिलांची मालगाडीखाली आत्महत्या - अकोला मालगाडीखाली उडी घेत महिलांची आत्महत्या

मूर्तिजापूर येथील रेल्वे स्टेशनवर दोन अनोळखी महिलांनी आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री उशिरा दोन महिला वय अंदाजे 55 व 30 वर्षे यांनी मालगाडीसमोर उभे राहून आत्महत्या केल्याचे समजत आहे. या दोन महिला कोण, कुठल्या आहेत, हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही.

अकोला अनोळखी महिलांची आत्महत्या
अकोला अनोळखी महिलांची आत्महत्या

By

Published : Oct 3, 2020, 6:59 PM IST

अकोला - मूर्तिजापूर रेल्वेस्थानकाजवळ दोन अनोळखी महिलांनी मालगाडी खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मूर्तिजापूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अनोळखी महिलांचा तपास लावण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा -'सुशांतची हत्या की, आत्महत्या; आमच्याकडे अद्याप अधिकृत माहिती नाही'

मूर्तिजापूर येथील रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रात्री उशिरा दोन महिला वय अंदाजे 55 व 30 वर्षे यांनी मालगाडीसमोर उभे राहून आत्महत्या केल्याचे समजत आहे. या दोन महिला कोण, कुठल्या आहेत, हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही. मूर्तिजापूर रेल्वे पोलीस चौकीचे प्रभारी राजू जळमकर यांनी वंदे मातरम् आपत्कालीन पथकाला घटनेची माहिती दिली. पथकाचे संचालक पुंडलिक सगेले, अध्यक्ष सेनापती, उपाध्यक्ष गौतम दिंडोरे, सचिव विक्की गावंडे, सरचिटणीस सागर वांदे, सदस्य अक्षय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन या महिलांचे मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीयसाठी तपासणीसाठी पाठवले.

हेही वाचा -'आठ-दहा पत्रं पाठवली; तरीही महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांची नियुक्ती नाही'

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details