अकोला - छत्तीसगडच्या दोन मावस बहिणींनी धावत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मनारखेड रेल्वे चौकी परिसरातील ही घटना आहे. या दोघींनी मुंबई-कोलकाता रेल्वेतून बुधवारी रात्री पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. बेबी राजपुत आणि पूजा गिरी असे मृत मुलींची नावे आहेत.
दोन्ही मृत मुली छत्तीसगड येथील रहिवासी ( deceased girls residents of Chhattisgarh ) आहेत. रागाच्या भरात त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघीही विद्यार्थीनीच्या गणवेशात ( two sisters suicide in Akola ) होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात 19 वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर ( Manarkhed railway station in Akola ) आढळून आले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
बेपत्ता असल्याची केली होती तक्रार -अकोल्यातील उरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला. बेबी राजपुत आणि पूजा गिरी या दोघी एकमेकींच्या मावस बहिणी आहेत. या दोन्ही मुलींनी चार दिवसांपूर्वी आयटीआयला जातो, असे सांगून घर सोडले, असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्या दोघी घरी परतल्याच नाहीत. त्यांची शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलीस स्टेशन गाठले. त्याठिकाणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.