अकोला - मध्य प्रदेशातील इंदूर गुन्हे शाखेने काही अट्टल चोरट्यांना अटक केली असून या चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील दोन सराफांना विक्री केले. त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांनी दोन सराफांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. यामध्ये शेखर अग्रवाल व अजय गोयंका यांचा समावेश आहे.
अकोल्यातील दोन सराफा व्यापारी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात - अकोला सराफा व्यापारी न्यूज
मध्यप्रदेश पोलिसांनी अकोल्यातील राजेश ज्वेलर्सचे संचालक शेखर राजेश अग्रवाल व राजश्री ज्वेलर्सचे संचालक अजय हनूमानप्रसाद गोयनका या दोघांना सराफा बाजारातून ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
इंदूर गुन्हे शाखेने घरफोडी तसेच सोन्याचे दागिने व चांदी आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या. यामधील चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील सराफांना विकल्याचे इंदूर पोलिसांना तपासात सांगितले. त्यानुसार इंदूर पोलीस अकोल्यात दाखल झाले होते. त्यांनी चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या राजेश ज्वेलर्सचे संचालक शेखर राजेश अग्रवाल व राजश्री ज्वेलर्सचे संचालक अजय हनूमानप्रसाद गोयनका या दोघांना सराफा बाजारातून ताब्यात घेतले.
या दोन सरफांनी चोरीतील 88 ग्रॅम सोन्याचे दागिने व 480 ग्रॅम चांदीचे दागिने खरेदी केल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली. या माहितीवरून मध्य प्रदेश पोलिसांनी दोन्ही सराफांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याआधी मध्य प्रदेश पोलिसांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.