अकोला- बाळापूर तालुक्यातील बोराखडी गावाजवळ शेतात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. दुपारी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. कपिल शेंगोकर (वय १५) आणि बाळकृष्ण उमाळे (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी माहिती दिली आहे.
अकोल्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू - akola
बाळापूर तालुक्यातील बोराखडी येथील कपिल शेंगोकर आणि बाळकृष्ण उमाळे हे दोघे शेतात भरपावसात काम करीत होते. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली असतानाच या दोघांववर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वीज पडून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
अकोला जिल्ह्यात पाऊस चांगला पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. अनेक शेतकरी शेतात पेरणी करताना दिसत आहेत. बाळापूर तालुक्यातील बोराखडी येथील कपिल शेंगोकर आणि बाळकृष्ण उमाळे हे दोघे शेतात भरपावसात काम करीत होते. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली असतानाच या दोघांववर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.