अकोला- अकोट फाईलमधील संजय नगरमध्ये राहणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. शेख साऊथ शेख रमजान, फारुख खैरू जमबुरेवाले ही मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. शेख साऊद यांचा घरी तर फारुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोल्यात दोघांचा संशयास्पद मृत्यू; कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू - akot fael akot
या दोघांचा मृत्यू गावठी दारू पिल्याने झाल्याचे बोलले जात असले तरी याला मात्र अकोट फाईल पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी दुजोरा दिला नाही. आम्ही मुख्य कारणांचा शोध घेत असल्याचे सांगून त्यांचा वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
अकोट फाईल परिसरातील नायगाव येथे सकाळी शेख साऊद शेख रमजान, फारुख खैरू जमबुरेवाले हे दोघे सोबत होते. यामधील शेख साउद यांचा घराजवळ मृत्यू झाला. तर, फारुख यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोट फाईल पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या दोघांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या दोघांचा मृत्यू गावठी दारू पिल्याने झाल्याचे बोलले जात असले तरी याला मात्र अकोट फाईल पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी दुजोरा दिला नाही. आम्ही मुख्य कारणांचा शोध घेत असल्याचे सांगून त्यांचा वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.