अकोला- महान ते पिंजर रोडवरील बोट नाल्याजवळ मोटारसायकलवरुन तीनजण जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिसरा व्यक्ती हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली.
पिंजर-महान रस्त्यावर दुचाकीला अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर - TWO WHEELER
दीनकर भानुदास पडघान, बाळु भानुदास पडघान, चंदुसिंग मेघासिंग जाधव हे तिघे दुचाकीने (क्र. एमएच - 30 - डब्ल्यू 1329) जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
दीनकर भानुदास पडघान, बाळु भानुदास पडघान, चंदुसिंग मेघासिंग जाधव हे तिघे दुचाकीने (क्र. एमएच - 30 - डब्ल्यू 1329) जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. ही दुचाकी जोरदार खाली पडली. यामध्ये दिनकर पडघान यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी बाळू पडघान, चंदूसिंग जाधव हे गंभीर जखमी झाले.
यानंतर संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने जखमींना तात्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंदूसिंग जाधव यांना मृत घोषित केले. यामध्ये बाळू पडघान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पिंजर पोलीस पुढील तपास करत आहेत.