महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला येथे भिंत कोसळल्यामुळे दोन सख्खे भाऊ जखमी - Sheikh Adil Kazipura

गेल्या दोन दिवसांपासून पातूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काजीपुरा परिसरात शेख निसार यांची घराची भिंत कोसळली. त्यामध्ये शेख अजमत शेख अखिल व त्याचा भाऊ शेख आदिल शेख अखिल, हे दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले.

जखमी मुलांची छायाचित्र

By

Published : Sep 11, 2019, 5:07 PM IST

अकोला- पातूर शहरातील काजीपुरा परिसरात भिंत कोसळण्याच्या घटनेत दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर दोन्ही भावांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील शेख आदिल यास आज रुग्णालयातून सोडण्यात आले. तर शेख निसार याच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पातूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काजीपुरा परिसरात शेख निसार यांची घराची भिंत कोसळली. त्यामध्ये शेख अजमत शेख अखिल व त्याचा भाऊ शेख आदिल शेख अखिल, हे दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पातूरचे नायब तहसीलदार सय्यद ऐहसान उद्दीन व तलाठी किशोर खुरसडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेमुळे पातूर शहरातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details