अकोला - खटकाली गावाजवळ अकोट येथील इफ्तेखार प्लॉटमधील राहणारे दोन युवक हे पठार नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) दुपारी बुडून मृत्यू झाला. शेख मोईन शेख अमीन (वय 19 वर्षे), शेख सुफियान शेख हमीद (वय 18 वर्षे), अशी त्यांची नावे आहेत.
अकोट शहरातील इफ्तेखार प्लॉट येथील दोघे हे पोहण्यासाठी खटकाली परिसरातील पठार नदीच्या डोहातील नदीपात्रात गेले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. बराच वेळ झाल्यानंतरही ते पाण्याच्या बाहेर न आल्याने सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्या ठिकाणी असलेल्या काहींनी त्यांचा पाण्यात शोध घेतला. काही वेळाने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.