महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 31, 2021, 4:14 PM IST

Updated : Mar 31, 2021, 4:20 PM IST

ETV Bharat / state

शेतकऱ्यास लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेती माल विकून लाख रुपयांची रोख घेऊन मळसुर या गावी जाणाऱ्या शेतकऱ्यांस दोघांनी लुटले होते. त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख 55 हजार रुपये जप्त केले आहेत.

Two arrested in farmer robbing case
Two arrested in farmer robbing case

अकोला - अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेती माल विकून लाख रुपयांची रोख घेऊन मळसुर या गावी जाणाऱ्या शेतकऱ्यांस दोघांनी लुटले होते. त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख 55 हजार रुपये जप्त केले आहेत.

पातूर तालुक्यातील मळसुर येथील विलास काळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. त्यांनी हरभरा विकल्यानंतर ते रोख एक लाख रुपये रक्कम घेऊन आपल्या गावी दुचाकीने जात होते. नांदगाव फाट्याजवळ त्यांना दोन युवकांनी थांबविले. दुचाकीतील पेट्रोल संपल्याचे त्यातील एकाने त्यांना सांगितले. एकाला ते दुचाकीवर बसवून नांदगाव फाट्यावर आले. त्याठिकाणी दोघांनी त्यांच्याजवळील एक लाख रुपयांची रोख घेऊन ते पळून गेले. याप्रकरणी त्यांनी पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शेतकऱ्यास लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत वाशिम येथील विजय गुप्ता, लखन गवळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांकडून एक लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्रमांक एमएच 37 झेड 3803) किंमत 40 हजार रुपये जप्त केली आहे. तसेच 15 हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण एक लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी केली आहे.
Last Updated : Mar 31, 2021, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details