अकोला -रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. चक्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16 च्यावर रेमडेसिवीर परस्पर विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कंत्राटी ऋषिकेश चव्हाण आणि परिचारिका संगीता बडगे, असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 रेमडीसीविर इंजेक्शन जादा दराने विक्री केल्याचे समोर आले आहे. तसेच याप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यत ५० वर रेमडेसिवीरचा काळाबाजार -
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कर्तव्य बजविण्यासाठी दिले होते. पोलिसांनी परिचारक ऋषिकेश चव्हाण आणि परिचारिका संगीता बडगे या दोघांकडून एक रेमडेसिवीर ताब्यात घेतले आहे. या दोघांनी शासकीय रुग्णालयातून रेमडेसिवीर चोरी करून बाहेर विकले आहे. जवळपास १६ च्यावर रेमडेसिवीर या दोघांनी चोरी करून त्याचा काळाबाजार केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, अकोल्यात आतापर्यत ५० वर रेमडेसिवीरचा काळाबाजार झाला असून तब्बल २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन