अकोला- सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातील 14 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सकाळीही 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे, रविवारी दिवसभरात जिल्ह्यात 29 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या चौदा जणांमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट, शंकर नगर व लाडीज फाईल येथील प्रत्येकी दोन तसेच शेगांव (जिल्हा बुलडाणा), वाडेगांव, हरिहर पेठ, जूने शहर, कोळंबी महागांव, अशोक नगर, मोचीपुरा आणि लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील सात अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केंद्रावरील आहेत.
उपचार घेताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी नायगांव येथील 48 वर्षीय पुरुष 8 जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. तसेच शेगांव येथील 50 वर्षीय महिला रुग्णाचा 20 जूनला मृत्यू झाला. ही महिला 19 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. आज दुपारनंतर दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
*प्राप्त अहवाल- २२७
*पॉझिटिव्ह- २९