अकोला - जिल्ह्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 28 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 912 झाली आहे. तर, एका 76 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि नागरिक चिंतेत आहेत.
अकोल्यात 28 कोरोना पॉझिटिव्ह; वृद्ध रुग्णाचा मृत्यू
अकोल्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 28 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 912 झाली आहे. तर, एका 76 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राप्त अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांत 10 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फैल, दोन जण इंदिरानगर वाडेगाव, दोन जण सिंधी कॅम्प येथील तर, उर्वरित दसेरानगर, गुलजारपूरा, दगडी पूल, मोहता मिल, अकोट फैल, जीएमसी क्वार्टर, गंगा नगर, बंजारा नगर, उमरी, शेलार फैल गुरुद्वारा पेठजवळ, नेहरू नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी, टॉवर रोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, काल (ता. 10) रात्री 76 वर्षीय रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले. ही व्यक्ती हरिहरपेठ येथील रहिवासी असून ती 3 जून रोजी दाखल झाली होती.
*प्राप्त अहवाल-६६
*पॉझिटीव्ह-२८
*निगेटीव्ह-३८
आता सद्यस्थिती
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९१२
*मयत-४३(४२+१)
*डिस्चार्ज-५७७
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२९२