महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक पलटी; चालक जखमी - akola accident news

समोरुन येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून ट्रकमध्ये असलेल्या अंगूरचे (द्राक्षे) मोठे नुकसान झाले आहे. रिधोरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

truck-overturns-while-overtaking-the-driver-was-injured
अकोल्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक पलटी होऊन चालक जखमी

By

Published : Dec 3, 2019, 9:27 PM IST

अकोला - समोरुन येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून ट्रकमध्ये असलेल्या अंगूरचे मोठे नुकसान झाले आहे. रिधोरा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

अकोल्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक पलटी होऊन चालक जखमी

हेही वाचा- सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद; स्थानिकांचा सुटकेचा निश्वास

नाशिक येथून अंगुरच्या पेट्या घेऊन ट्रक कोलकोत्याकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा गावाजवळ पोहोचताच ट्रकचालकाने समोरुन येणाऱ्या ट्रकला व्होवरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने ब्रेक लावला. मात्र, मागील चाकाचा ब्रेक जाम झाल्याने ट्रक उलटला. या घटनेत चालक निपुण राय हा जखमी झाला असून क्लिनर सोपान मंडल (रा. पश्चिम बंगाल) जखमी झाला आहे. या अपघातात ट्रकसह ट्रकमधील अंगुरचे मिळून अंदाजे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details