अकोला - समोरून येणाऱ्या मोटरसायकलला टाटा 407 ट्रकची धडक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी तेल्हारा तालुक्यातील आडसूळ नजीक शेगाव अकोट रोडवर हा अपघात झाला.
तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
अकोट येथील कापसाने भरलेला मिनी ट्रक टाटा 407 (क्रमांक एमएच - 04 - जीसी - 9420) हा अकोटकडे जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणारी (एमएच 28 एव्ही 3288) हिरो डीलक्स या गाडीला धडक देऊन ट्रक पलटी झाला. दुचाकी चालक प्रल्हाद किसन अडकणे, तर मिनी ट्रकमधील जमीर शहा शब्बीर शहा, शेख मोबीन शेख इमाम असे तिघे जागेवरच ठार झाले. तर अरुण डांगे व गणेश अगळते हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.