अकोला -राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या धडकेत, एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला. ईश्र्वर जोशी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ट्रक - दुचाकीचा अपघात, एक जण ठार - One died in the accident Akola
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या धडकेत, एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला. ईश्र्वर जोशी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
![ट्रक - दुचाकीचा अपघात, एक जण ठार Truck bike accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9902115-731-9902115-1608127084805.jpg)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्र्वर पंढरीनाथ जोशी हे बोरगाव मंजूकडून अकोल्याकडे जात होते. याच दरम्यान अकोल्याकडून बोरगाव मंजूकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भिषण अपघातात ईश्र्वर जोशी हे गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, व जोशी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रकसह चालकास ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.