अकोला -अकोला शहर वाहतूक शाखेने फटाके फोडणाऱ्या बुलेटवर कारवाई करीत त्याचे सायलेन्सर जप्त केले आहेत. यानंतर हे सायलेन्सर परत न देता ते वरिष्ठांची परवानगी घेत न्यायालयाच्या आदेशाने हे 45च्या वर सायलेन्सर रोडरोलरखाली नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. शहर वाहतूक शाखेची ही पहिलीच कारवाई आहे. अशी कारवाई आतापर्यंत कुठे झाली नसल्याची माहिती आहे.
शहरात काही तरुण बुलेटवर फटाके फोडणारे सायलेन्सर लावून फटाके फोडत होते. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांनी ते सायलेन्सर ही काढून टाकले. हे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले.हे सायलेन्सर परत करण्याऐवजी पोलिसांनी ते बुलेटचालकास परत केले नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी तसेच न्यायालयाची परवानगी घेत शहर वाहतूक शाखेने हे सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट केले. या कारवाईमुळे बुलेट चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.