महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात पर्यटकांना पट्टेदार वाघ आणि अस्वलाचे दर्शन - पर्यटकांना पट्टेदार वाघ आणि अस्वलाचे दर्शन

जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघ आणि अस्वलाचे दर्शन झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जंगल सफारीसाठी येत असतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघ आणि अस्वलाचे दर्शन झाल्यामुळे पर्यटक याकडे दिवसेंदिवस आकर्षित होत आहेत.

मेळघाटात पर्यटकांना पट्टेदार वाघ आणि अस्वलाचे दर्शन

By

Published : Nov 15, 2019, 5:32 PM IST

अकोला - अकोट तालुक्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघ आणि अस्वलाचे दर्शन झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जंगल सफारीसाठी येत असतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघ आणि अस्वलाचे दर्शन झाल्यामुळे पर्यटक याकडे दिवसेंदिवस आकर्षित होत आहेत.

मेळघाटात पर्यटकांना पट्टेदार वाघ आणि अस्वलाचे दर्शन

हेही वाचा -..म्हणून अकोल्यातील महापालिका आयुक्तांच्या दालनात फेकली घाण

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट्या, तडस, रानगवा, भेडकी, नीलगाय, रानकुत्रा, अस्वल तसेच विविध जातीचे पक्षी पहावयास मिळतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील शहानूर - बोरी हा सफारी मार्ग पर्यटकांसाठी एक नवी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. या जंगल सफारीमध्ये पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत धारगड - बोरी या भागामध्ये पर्यटकांना वाघांचे दर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण राज्यातील, देशातील आणि विदेशी पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात येतात.

हेही वाचा -अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका, कवडीमोल भावात होतेय विक्री

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्रप्रकल्प अमरावती एम.एस.रेड्डी आणि उप वन संरक्षक टी. ब्युला एलिल मती यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी आणि कर्मचारी हे नेहमी तत्पर राहून व्याघ्र प्रकल्पांमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम सुविधांसह प्राण्यांचे संरक्षण सुद्धा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील पर्यटक आदिनाथ भाले हे आपल्या परिवारासह मेळघाट व्याघ्र प्रकल्प मध्ये आले होते. भाले कुटुंब हे जंगल सफारीसाठी गेल्यानंतर त्यांनी धारगड भागामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना दोन पट्टेदार वाघ आणि त्यांच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. तसेच थोड्या अंतरावर त्यांना अस्वलही दिसले.

ABOUT THE AUTHOR

...view details