अकोला - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शहानुर-बोरी व्याघ्र सफारीत पर्यटकांना सकाळी आठच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. या सफारीत पर्यटकांनी पट्टेदार वाघाला बधून चित्तथरारक अनुभव घेतला. यावेळी धारगड येथील आर. एफ. ओ. सुनील वाकोडे व वनरक्षक सुद्धा उपस्थित होते.
मेळघाटातील शहानूर-बोरी जंगल सफारीत पट्टेदार वाघाचे दर्शन - जंगल सफारीत बद्दल बातमी
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटकांनी या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शहानूर-बोरी येथे व्याघ्र सफारी दरम्यान चित्तधरारक अनुभव आला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील नैसर्गिक वनसंपत्ती व मोठ्या प्रमाणात होणारे वन्यप्राण्यांचे दर्शन यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील आणि संपूर्ण देशातील पर्यटक मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये येऊन जंगल सफारीचा अनुभव घेतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन सफारी मार्ग सुद्धा तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक आपल्या कुटुंबासह सफारीचा अनुभव घेतात. अकोट येथील पर्यटक डॉ. शाम बोंद्रे व सागर कस्तुरे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील शहानूर-बोरी जंगल सफारीचा अनुभव घेत असताना त्यांना अचानक एका झुडुपामध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.