अकोला - दिवसेंदिवस अकोला जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. आज (बुधुवार) सकाळी मिळालेल्या अहवालात आणखी 11 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे अकोल्यात एकूण रुग्णांची संख्या दीड हजाराच्या वर गेली आहे.
अकोल्यात आणखी 11 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या दीड हजाराच्या वर - अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
दिवसेंदिवस अकोला जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. आज (बुधुवार) सकाळी मिळालेल्या अहवालात आणखी 11 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत.
अकोल्यात आणखी 11 कोरोनाग्रस्तांची नोंद
या ११ जणांच्या अहवालात तीन महिला व आठ पुरुष असून, त्यातले चार जण अकोट येथील, दोन जण गवळीपूरा तर उर्वरित मोठी उमरी, कैलास नगर, डाबकी रोड, जेल क्वार्टर व बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*प्राप्त अहवाल-१२१
*पॉझिटीव्ह अहवाल-११
*निगेटीव्ह-११०
*सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५६१
*मयत-७९ (७८+१)
*डिस्चार्ज-११४५
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३३७