महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात आणखी 7 जणांना कोरोना, एकूण संख्या १५४वर - akola latest news

अकोला जिल्ह्यात दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे १७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १६५ अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Today 7 corona positive cases found in akola
अकोल्यात आणखी 7 जणांना कोरोना

By

Published : May 10, 2020, 10:12 PM IST

अकोला - दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे १७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १६५ अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या १५४ झाली आहे.

आज सकाळी उपचार सुरू असताना एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या १२७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १ हजार ७३७ नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार ५७८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १ हजार ४२४ अहवाल निगेटिव्ह तर १५४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच १५९ अहवाल प्रलंबित आहेत. दिवसभरात प्राप्त झालेल्या १७२ अहवालात १६५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी पाच पुरुष व दोन महिला आहेत. हे रुग्ण मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, बैदपूरा, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत. सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेली महिला ही फतेह चौक या भागातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
आज सकाळी एका ५० वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही महिला खैर महम्मद प्लॉट येथील रहिवासी होती. ती गुरुवार दि. ७ मे रोजी दाखल झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details