महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात आणखी ७ कोरोना पॉझिटीव्ह; चौघांचा मृत्यू - coroana update in akola

अकोला जिल्ह्यात दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे १०० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ९३ अहवाल निगेटीव्ह तर ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

today  7 corona positive cases found in akola
अकोल्यात आणखी ७ कोरोना पॉझिटीव्ह

By

Published : May 6, 2020, 11:04 PM IST

अकोला - दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे १०० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ९३ अहवाल निगेटीव्ह तर ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ८२ झाली असून, प्रत्यक्षात ५७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, गेल्या महिनाभर उपचार घेणाऱ्या 3 वर्षीय चिमुरड्यास आज पुर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

3 वर्षीय चिमुरड्याची कोरोनावर मात


आजपर्यंत एकूण १ हजार १२० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९२३, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १ हजार ३९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८४५ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९५७ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल ८२ आहेत. तर आज अखेर ८१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. प्राप्त झालेल्या १०० अहवालात ९३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेले महिनाभर उपचार घेऊन पुर्ण बरा झालेल्या एका 3 वर्षीय बालकास घरी सोडण्यात आले. हा बालक ७ एप्रिल रोजी दाखल झाला होता. हा बैदपुरा येथील रहिवासी आहे. आज तब्बल महिनाभराच्या उपचारानंतर त्यास घरी सोडण्यात आले. आता ह्या बालकास १४ दिवस गृह अलगीकरणात रहावे लागणार आहे.

अकोल्यात आणखी ७ कोरोना पॉझिटीव्ह
4 जणांचे मृत्यूदरम्यान, मृत्यू झालेल्या 4 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील एक रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला. हा रुग्ण खंगारपुरा भागातील ६५ वर्षीय पुरुष होता. हा रुग्ण २ मे रोजी दाखल झाला होता. काल ५ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच ३ मे रोजी दाखल झालेली ७७ वर्षीय महिलेचाही ५ मे रोजी मृत्यू झाली. तिचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. तो आज प्राप्त झाला. तर अन्य एक ६५ वर्षीय महिला देखील ३ मे रोजी दाखल झाली होती. तिचाही मृत्यू काल ५ मे रोजी झाला. परंतू तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तो आज प्राप्त झाला. तसेच अन्य एका ७० वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अकोल्यात आणखी ७ कोरोना पॉझिटीव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details