महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात दिवसभरात 40 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह; तर 16 रूग्ण बरे

आज प्राप्त झालेल्या 138 अहवालापैकी 40 जण पॉझिटिव्ह आणि 98 जण निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

Akola Government Medical College
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

By

Published : Jun 3, 2020, 7:53 PM IST

अकोला- जिल्ह्यात आज सकाळी 36 आणि सायंकाळी आलेल्या अहवालात 4 जण पॉझिटिव्ह, असे एकूण 40 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर दुपारी 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज सायंकाळी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 3 महिला व 1 पुरुष आहे. ते खदान, अकोट फैल, शिवाजी नगर आणि संताजी नगर येथील रहिवासी आहेत. दुपारनंतर 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार महिला व 12 पुरुष आहेत. त्यातील 5 जण रामदास पेठ , 3 जण अकोट फैल तर खदान, मलकापूर, सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट, कैलास टेकडी, छोटी उमरी, रजपूत पुरा, हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. आज प्राप्त झालेल्या 138 अहवालापैकी 40 जण पॉझिटिव्ह आणि 98 जण निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत.

सुट्टी दिलेल्या 16 जणांपैकी 3 जणांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित 13 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

आताची सद्यस्थिती-

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 667
मृत- 34 (33+1)
डिस्चार्ज- 478
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- 155

ABOUT THE AUTHOR

...view details