महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांची नोंद, पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू - अकोला कोरोना न्यूज

अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. सकाळच्या अहवालात 25 जण पॉझिटिव्ह आले होते, तर सायंकाळच्या सत्रात 2 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात अकोल्यामध्ये २७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली.

today 27 new corona positive cases found in akola
अकोल्यात दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांची नोंद

By

Published : Jun 20, 2020, 8:57 PM IST

अकोला - अकोल्यात आज (शनिवार) सायंकाळी आलेल्या अहवालात ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायंकाळच्या अहवालात दोघे पॉझिटिव्ह आले तर दहा जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सकाळच्या अहवालात 25 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 27 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. ते दोन्ही पुरुष आहेत. त्यातील जवाहरनगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान, उपचार घेताना आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी शंकर नगर, अकोट फैल येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते 16 जून रोजी दाखल झाले होते. गुलजारपुरा येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, ते 16 जून रोजी दाखल झाले होते. पातूर येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ती 15 जून रोजी दाखल झाले होती. मोठी उमरी येथील 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून ते 8 जून रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यांना ओझोन हॉस्पीटल येथे 14 जून रोजी रेफर करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ओझोन हॉस्पीटल येथे आज झाला आहे. तर अकबर प्लॉट, अकोट येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते 5 जून रोजी दाखल झाले होते. त्यांचा 19 जून रोजी मृत्यू झाला आहे.


आज दुपारनंतर दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील ६ जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

*प्राप्त अहवाल- ३२३
*पॉझिटीव्ह- २७
*निगेटीव्ह- २९६

सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह*
*अहवाल-११६३
*मृत-६४ (६३+१)
*डिस्चार्ज- ७५२
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह *पॉझिटीव्ह)- ३४७

ABOUT THE AUTHOR

...view details