महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात दिवसभरात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह, तर 11 जणांची कोरोनावर मात - अकोल्यात कोरोना रुग्णांत वाढ

दिवसेंदिवस अकोला जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (बुधुवार) सकाळी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात 12 आणि सायंकाळी आलेल्या अहवालात 6 असे एकूण 18 जण पॉझिटीव्ह आले आहेत.

Today 18 new corona positive cases found in akola
अकोल्यात दिवसभरात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह,

By

Published : Jul 8, 2020, 6:14 PM IST

अकोला - दिवसेंदिवस अकोला जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.आज (बुधुवार) सकाळी आलेल्याकोरोना तपासणी अहवालात 12 आणि सायंकाळी आलेल्या अहवालात 6 असे एकूण 18 जण पॉझिटीव्ह आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर 11 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज सायंकाळी आलेल्या 6 पॉझिटिव्ह अहवालापैकी 4 महिला व 2 पुरुष आहेत. त्यातील दोन जण महान येथील, दोन जण अकोट येथील तर उर्वरित धोत्रा मुर्तिजापूर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात तर कोविड केअर सेंटर मधून चार अशा ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ते दोघे बाळापूर, दोघे अकोट, दोघे दगडी पूल येथील तर उर्वरीत अकोट फैल, आगरवेस, जेल क्वार्टर, सोनटक्के प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

आजचा प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल - ३७०
पॉझिटीव्ह- १८
निगेटीव्ह- ३५२


सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १ हजार ७९७
मृत -९१ (९०+१)
डिस्चार्ज- १ हजार ३४४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३६२

ABOUT THE AUTHOR

...view details