महाराष्ट्र

maharashtra

अकोलाकरांची वाढली चिंता; दिवसभरात 13 कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 7, 2020, 8:18 PM IST

दिवसेंदिवस देशासह राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज सलग चौथ्या दिवशी अकोल्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात 13 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

Today 13 corona positive cases found in akola
अकोल्यात दिवसभरात 13 कोरोना पॉझिटिव्ह

अकोला - दिवसेंदिवस देशासह राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज सलग चौथ्या दिवशी अकोल्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात 13 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, अकोलाकरांची चिंता वाढली आहे.

कोरोनाग्रस्तांचा वाढत असलेला आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात एकूण 95 कोरोनाबाधित रुग्ण असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांनी कोरोणावर मात केली असून प्रत्यक्षात आता 63 जणांवर उपचार सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आलेल्या 6 अहवालांमधून सर्व अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. हे रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा, अकोट फैल, बैदपुरा, माळीपूरा, खंगारपुरा, न्यू भीमनगर, भीमनगर, जुने शहर व 4 जण हे बैदपुरा येथील रहिवासी आहेत. अंत्री पिंजरनंतर उगवा या ग्रामीण भागातही रुग्ण सापडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

12, 11, 9 व आज 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेला हा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात एकूण 95 कोरोनाबाधित रुग्ण असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांनी कोरोणावर मात केली असून प्रत्यक्षात आता 63 जणांवर उपचार सुरू आहेत.Body:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आलेल्या सहा अहवालांमधून सर्व अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. हे रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा, अकोट फैल, बैदपुरा, माळीपुरा, खंगारपुरा, न्यू भीमनगर, भीमनगर, जुने शहर व चार जण बैदपुरा येथील रहिवासी आहे. अंत्री पिंजर नंतर उगवा या ग्रामीण भागातही हा रुग्ण सापडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

प्राप्त अहवाल - 32
पॉझिटिव्ह- 13
निगेटिव्ह- 19

ABOUT THE AUTHOR

...view details