अकोला -महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहाला देण्यात आलेल्या टिपू सुलतान (Tipu Sultan Name Politics) या नावावरून आता भाजप, शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले आहेत. महापालिकेमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल हे महाविकास मंचमध्ये असताना त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतान हे नाव दिले होते. परंतु, सध्या अग्रवाल यांनी या नावाला आता विरोध असल्याची भूमिका घेतल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यावर काँग्रेस आणि शिवसेनेने तोफ डागली आहे.
Tipu Sultan Name Politics: अकोला मनपातील स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव, राजकारण तापले - अकोला महानगरपालिका बातमी
अकोला महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहाला देण्यात आलेल्या टिपू सुलतान या नावावरून आता भाजप, शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर आले आहेत. महापालिकेमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष विजय अग्रवाल हे महाविकास मंचमध्ये असताना त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतान (Tipu Sultan Name Politics) हे नाव दिले होते. परंतु, सध्या अग्रवाल यांनी या नावाला आता विरोध असल्याची भूमिका घेतल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे.

राज्याच्या राजकारणामध्ये टिपू सुलतान नावावरून वादळ उठलेले असताना अकोल्यातही याच कारणावरून राजकीय वादळ उभे झाले आहे. सध्याचे भाजपचे शहराध्यक्ष विजय अग्रवाल महाविकास मंचमध्ये असताना त्यांनी स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास सूचक म्हणून मान्यता दिली होती. आता सध्या ते भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये असल्यावर त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतान या नावाला विरोध केला आहे. या नावाला विरोध केल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर आपला राजकीय रोष व्यक्त केला आहे.