महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाइन'च्या माध्यमातून शेतकरी पुत्रांनी केला कृषी कायद्याला विरोध - ns of farmers protested against the agricultural law

शेतकऱ्यांच पहिलं प्रेम हे त्यांच्या शेतीवर असत. या शेतीचाच गळा घोटण्याचा प्रकार केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी 'सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाइन' ही मोहीम राबवून कृषी कायद्याला विरोध केला.

'सेव माय फर्स्ट व्हॅलेंटाइन'च्या माध्यमातून शेतकरी पुत्रांनी केला कृषी कायद्याला विरोध
'सेव माय फर्स्ट व्हॅलेंटाइन'च्या माध्यमातून शेतकरी पुत्रांनी केला कृषी कायद्याला विरोध

By

Published : Feb 14, 2021, 6:33 PM IST

अकोला - शेतकऱ्यांच पहिलं प्रेम हे त्यांच्या शेतीवर असत. या शेतीचाच गळा घोटण्याचा प्रकार केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी 'सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाइन' ही मोहीम राबवून कृषी कायद्याला विरोध केला. शहरातून शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून या शेतकरी पुत्रांनी व मुलींनी नागरिकांना फुले देऊन आमच पहिलं प्रेम शाबूत ठेवण्यासाठी हा गांधीगिरिचा मार्ग अवलंबला. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकार्‍यांना गुलाबपुष्प व निवेदन दिले.

अक्षय राऊत

शेतकरी पुत्रही शेतीला वाचवण्यासाठी लढा देत आहे-

शेतकरी हा शेतीवर प्रेम करत असतो. त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. शेती हे त्याचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे त्याचा खरा व्हॅलेंटाईन हा शेतीसोबतच असतो. शेतकऱ्यांचा व्हॅलेंटाईनच धोक्यात आला असल्याने शेती वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या दरबारी शेतकरी आंदोलन करीत आहे. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कुठल्याही मागणीला मान्य करीत नाही आणि हे कृषी कायदे रद्द करण्यासाठी स्वतःचा हट्टही सोडत नाही. जगात आज व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना देशातील शेतकरी पुत्रही शेतीला वाचवण्यासाठी लढा देत आहेत.

गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन-

या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून शेतकरी पुत्र व मुलींनी एकत्र येत अकोला शहरातून प्रत्येकाला गुलाब पुष्प व एक संदेश पत्र देऊन शेतकऱ्यांची शेती वाचविण्याच्या या लढ्यात सहभागी होण्याचे गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करीत आव्हान केले.

महापालिकापासून सुरू झालेली ही मोहीम गांधी चौक, फतेह चौक, टॉवर चौक, मदनलाल धिंग्रा चौक, मोठे पोस्ट ऑफिस चौकमार्गे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी पोहोचले. शेतकरी पुत्रांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांनी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच गुलाब पुष्प आणि संदेश पत्र ठेवून ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचवले.

'सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाइन' -

अप्पर जिल्हाधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन व निवेदन देऊन 'सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाइन' या मोहीम बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे माहिती द्यावी, अशी विनंती केली. ही मोहीम कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली अक्षय राऊत यांच्या माध्यमातून काढण्यात आली. यावेळी शेतकरी जागरणाची पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा-रयतेची काळजी म्हणून शिवजयंतीवर निर्बंध - संजय राऊत

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details