अकोला - विविध ठिकाणची वाहने चोरणाऱ्या तिघांना रामदास पेठ पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांनी 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. सागर सुरेश क्षीरसागर, विशाल नारायण गवई आणि लखन संजय गायकवाड असे या तीन चोरट्यांची नावे आहेत.
अकोल्यात दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक; ११ दुचाकी जप्त - अकोला शहर
त्यांच्याकडून पोलिसांनी 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. सागर सुरेश क्षीरसागर, विशाल नारायण गवई आणि लखन संजय गायकवाड असे या तीन चोरट्यांची नावे आहेत.
या चोरट्यांनी अकोला शहरातील रामदास पेठ परिसरातून ५ मोटर सायकली, सिव्हील लाईन १, खदान १, जीआरपी १ आणि अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून २ मोटर सायकली समवेत ११ वाहने तसेच किंमत ४ लाख ५० हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई शहर पोलीस अधीक्षक सचिन कदम, पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, स्वप्निल खेळकर, किशोर सोनोने, शेख अंसार, स्वप्निल चौधरी, श्रीकांत पातोंड, संजय अकोटकर, गोकुळ चव्हाण यांनी केली आहे.