महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात आणखी 31 कोरोना रुग्णांची नोंद, 21 जणांना डिस्चार्ज - अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या

सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमधील 31 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळी 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे, आज दिवसभरात एकूण 34 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे

total corona cases in akola
अकोल्यात आणखी 31 कोरोना रुग्णांची नोंद

By

Published : Jun 15, 2020, 8:36 PM IST

अकोला- सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमधील 31 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळी 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे, आज दिवसभरात एकूण 34 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सकाळी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर सायंकाळी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, दिवसभरात 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या 31 रुग्णांमध्ये 13 महिला तर 18 पुरुषांचा समावेश आहे. यात सिंधी कॅम्पमधील नऊ, बाळापूर येथील चार, चांदूर रोड येथील तीन, खदान येथील दोन, जीएमसी होस्टेल येथील दोन तर आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवाजी नगर, हिंगणा, रणपिसे नगर, रामदास पेठ, अकोट फैल, बार्शी टाकळी, शिवनी, अंबिकानगर, गंगानगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, सायंकाळी मृत्यू झालेला रुग्ण फिरदौस कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुष असून तो 2 जूनला उपचारासाठी दाखल झाला होता. आज 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यातील 16 जणांना घरी सोडण्यात आले असून पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

*आज प्राप्त अहवाल - १४३

*पॉझिटिव्ह - ३४

*निगेटिव्ह - १०९

*जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १०४१

*मृत - ५३

*डिस्चार्ज - ६५८

*ॲक्टिव्ह रुग्ण -३३०

ABOUT THE AUTHOR

...view details