अकोला - अकोट शहर पोलिसांच्या विशेष पथकाने अकोट-अंजनगाव मार्गावर कत्तलीसाठी जाणाऱ्या ३१ गोवंशांची सुटका केली. या गोवंशाना गोरक्षण संस्थांकडे सोपविण्यात येणार आहे.
कत्तलीसाठी जाणाऱ्या ३१ गोवंशांना जीवदान, अकोला पोलिसांची कारवाई - अंजनगाव
अकोला पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या ३१ गोवंशांची सुटका केली आहे.
अंजनगाव मार्गावर एक ट्रक गोवंश घेऊन येत असल्याची गुप्त माहिती ओत येथील विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रणजित सिंह ठाकूर याना मिळाली. यानंतर त्यांनी पथकासह ट्रकचा शोध घेतला आणि ट्रक दिसताच तो अडवून पाहणी केली. यावेळी ट्रकमध्ये गोवंश आढळले. यानंतर त्यांनी चालकास गोवंश खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत कागदपत्रे मागितली. मात्र, त्याच्याकडे काहीच माहिती आणि कागदपत्रे नव्हती. शेवटी पोलिसांनी चालकासह ट्रकमधील काही लोकांना ताब्यात घेतले असून गोवंशदेखील ताब्यात घेतले आहेत. पुढील कारवाई अद्यापही सुरू आहे.