अकोला- सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांपैकी जिल्ह्यातील दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळले आहेत. अकोल्यातील बाधितांची वाढती संख्या नागरिकांसाठी तसेच प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
सकाळी आलेल्या अहवालातील 28 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. अकोल्यात आतापर्यंत 914 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 43 जणांचा मृत्यू झाला आहे. ५७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्या 294 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे रुग्ण मोहता मिल रोड आणि जुने शहर या भागातील रहिवासी आहेत.
*आज प्राप्त अहवाल -१३८
*पॉझिटिव्ह-३०