अकोला - शहरात बुधवारीकोरोनाचे 72 नवे रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. आज 34 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आज ९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात 34 रुग्णांची कोरोनावर मात; एकाचा मृत्यू, तर 9 नवे रुग्ण - अकोल्यातील कोरोनाबाधित
आज दुपारी 34 जणांना सुट्टी देण्यात आली. त्यातील सात जणांना घरी, तर उर्वरित 27 जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
प्राप्त 9 पॉझिटिव्ह अहवालात सहा पुरुष व तीन महिला आहेत. हे रुग्ण सनगर कॉलनी वाशिम बायपास, राऊतवाडी, गायत्रीनगर कौलखेड, सिंधी कॅम्प, कमला नेहरुनगर, हरिहरपेठ, तेलीपुरा, गोरक्षण रस्ता मलकापूर येथील रहिवासी आहेत. दुपारी 34 जणांना सु्ट्टी देण्यात आली. त्यापैकी सात जणांना घरी, तर उर्वरित 27 जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण 80 वर्षीय वृद्ध असून फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे. हा रुग्ण 15 मे रोजी रुग्णालयात दाखल झाला. त्यांचा अहवाल 17 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा आज उपचार घेताना मृत्यू झाला.
प्राप्त अहवाल-२०१
पॉझिटिव्ह- 9
निगेटिव्ह-१९२
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५१६
मृत-२९(२८+१),
डिस्चार्ज-३४९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३४