अकोला - जिल्ह्यांमध्ये दुसऱ्यादिवशी प्राप्त झालेल्या अहवालांमधून 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यामध्ये पातूर येथील सहा जणांचा समावेश असून, त्या सहा जणांचे तिसर्यांदा अहवाल तपासण्यात आले आहे. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही आनंदाची गोष्ट असल्याने अकोल्याचा कोरोना विषाणू मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
पातूर येथील सहा जणांचा तिसरा फेरचाचणी अहवाल निगेटिव्ह; अकोलेकरांसाठी आनंदाची गोष्ट - patur covid 19 report
अकोला जिल्ह्यांमध्ये तीन कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर आधीचे असलेले कोरोना रुग्ण यांच्यामध्ये कमालीची सुधारणा होत आहे.
अकोला जिल्ह्यांमध्ये तीन कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. तर आधीचे असलेले कोरोना रुग्ण यांच्यामध्ये कमालीची सुधारणा होत आहे. पातूर येथील 6 जणांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणी अहवाल तिसऱ्यांदा प्राप्त झाले आहेत. हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यासोबतच इतर 14 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहे. आज एकूण 20 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामधून एकही रुग्ण कोरोना विषाणू संसर्गाने बाधित नसल्याचे स्पष्ट झाले.
अकोल्याची कोरोना विषाणू मुक्तीकडे वाटचाल होत असली तरी अकोला शहरातील बैदपुरा, अकोट फैल आणि बाळापूर शहरमधील प्रतिबंधित भाग असून त्या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. या तीनही प्रतिबंधित परिसरातून अद्यापपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.